Tuesday, 14 June 2011

अजून दुसरं काही?


आपलं नातं काय आहे? मलाच कळत नाही!
मैत्रीप्रेम की अजून दुसरं काही?

तुला भेटायचा म्हणून मी घरातून लवकर निघतो!
तू उशिरा येतेस म्हणून तुझ्यावर चिडतो!
रोज तुझी वाट पाहण्याची आता सवयचं झाली आहे!
की तू माझी समजूत काढावीस अशी वेड्या मनाची इच्छा आहे?

भेटल्यावर दोघंही शांत असतो, कुणालाच काही सुचत नाही!
फोनवर गप्पा मारताना मात्र आपलं बोलणं संपतच नाही!
बोलायचं नसतं मग भेटतो कशाला? यावर आपण भांडतो!
पण घरी जाताना 'पुन्हा नक्की भेटू' असं नेहमी का सांगतो?

तुला चिडवून, त्रास देऊन अगदी हैराण करतो!
नंतर तुझी समजूत काढून तुझा राग पळवून लावतो!
तुलाही माझ्या चिडवण्याची जणू सवयचं झाली आहे!
की मी समजूत काढतो म्हणून रागसुद्धा नकली आहे?

रात्री एकमेकांना missed  call  देतो
आणि वर 'झोप नाही लागत का?' विचारतो!
रात्रभर गप्पा मारतो आणि
लेक्चरमध्ये झोपा काढतो!

कुठेही फिरायला जाताना मित्रांची सोबत नकोशी वाटते!
पण उगाच कुणाला संशय येईल म्हणून त्यांचीच ढाल करावी लागते!
मनाला कुठेतरी सुखावून जाते  मला तुझ्या नावाने चिडवणे!
तुला चिडवून त्रास देतील म्हणून साफ नाकारतो त्यांचे अंदाज आणि टोमणे!

एकमेकांकडेच बघत बसावसं वाटतं
पण मित्रांमुळे आपण पाहत नाही!
आपण एकमेकांची खूप काळजी घेतो
पण सहसा तसा दाखवत नाही!

माझ्या मनातलं सगळं चेहऱ्यावर दिसतं
पण तुला कळू नये याची काळजी घेतो!
तू मला खूप आवडतेस म्हणून
तुला दुसरा कोणी आवडू नये यासाठी धडपडतो!

'माझं तुझ्यावर प्रेम आहे' हे शब्दचं ओठांवर येत नाहीत!
तुला हरवून बसेन अशी भीती वाटते की अजून मला तसं वाटत नाही?
मी काही नाही सांगणार आणि तूसुद्धा तशीच राहणार!
मग हे आपलं नातं पुढे कोणत्या वाटेने जाणार?

लोकांना वाटत म्हणून affair करायचं? की खरं प्रेम आहे म्हणून?
एवढेच जर एकमेकांना आवडतो मग का नाही टाकत सांगून?
आता काय आहे? पुढे काय होणार? कुणालाच माहित नाही!
आपलं नातं काय आहे? मैत्रीप्रेम की अजून दुसरं काही?

Sunday, 17 April 2011

आपलं College Life संपलं!

शेवटच्या Exam चा शेवटचा paper लिहित होतो,
Answers लिहिताना party चं planning करत होतो,
Supervisor ने शेवटची १५ min. उरली असं सांगितला,
आणि मला कळलं....अरे आपलं College Life संपलं!

घड्याळाचे काटे उलटे फिरले,
College ते दिवस सगळे डोळ्यांसमोर आले,
कसे हे दिवस भराभर निघून गेले...काहीच नाही कळलं,
सगळं नकळत घडलं...आपलं College Life संपलं!

उद्यापासून lectures, attendance ची कटकट नसणार होती,
पण lectures bunk करून picture बघण्याची मजा काही औरच होती,
त्या दिवशी १००% attendance पाहून सरांना नवल वाटलं,
आता सगळं संपलं...कारण आपलं College Life संपलं!

मित्रांसोबत केलेली मजा, त्या तासंतास केलेल्या गप्पा आठवतात,
party ची केलेली plannings आणि bike वरच्या ट्रिप्स आठवतात,
आता सर्व मित्राचं आयुष्य होणार आहे वेगळ वेगळ,
यार....आपलं College Life संपलं!

उद्यापासून एक नवीन जग सुरु होणार आहे,
Office मध्ये जाऊन सगळे काम करणार आहेत,
Casual संपून आता Formal जीवन सुरु झालं,
कारण आपलं College Life संपलं!

उनाडपणा सोडून आता जबाबदारीने वागावं लागणार,
खाण्यापिण्यावर जरा कमी खर्च करावा लागणार,
महिन्याच्या पगाराच Saving सुरु झालं,
कारण आपलं College Life संपलं!
आता ते presentations आणि assignments नसणार,
ग्रुप प्रोजेक्ट च्या नावाखाली केलेली भटकंती नसणार,
Important Notes चे गठ्यांनी रद्दीचं वजन वाढवलं,
miss u XEROX Machine...आपलं College Life संपलं!

बघता बघता दिवस निघून गेले...काहीच नाही कळलं,
गेल्या महिन्यातच Admission झालं...असं मला वाटलं,
चांगलं वाईट असं सगळं काही अनुभवलं,
का लवकर मोठे झालो आणि आपलं College Life संपलं!

जीवनात आता खूप सारी उलथापालथ होणार होती,
नव्या कोऱ्या पाटीवर आता कर्तबगारी कोरायची होती,
यशाची शिखरे गाठण्यासाठी या College Life ने खूप काही शिकवलं,
नको होतं तेचं झालं आणि आपलं College Life संपलं!

या सगळ्या विचारांनी डोळ्यात पाणी आलं,
पेपर उडून गेला आणि हातातलं पेन गळून पडलं,
वेळ संपली होती पण खूप काही करायचं राहून गेलं,
थोडा Extra Time मिळेल का?... कारण आपलं College Life संपलं!

Tuesday, 29 March 2011

बाकी सगळं ठीक आहे!

प्रिय आई आणि बाबांस ,

होस्टेलमध्ये कधी कधी लाईट नसते,
आंघोळीला गरम पाणी नसतं ,
गरमीमुळे झोपचं लागत नाही,
पण बाकी सगळं ठीक आहे!

मेसमध्ये पोळ्या कडक असतात,
भाजी एकतर कच्ची नाहीतर बेचव असते,
भातामध्ये खडे सापडतात,
बाकी सगळं ठीक आहे!

मित्रांना उधारी देऊन माझे पैसे संपतात,
मला गरजेपुरते पैसे देऊन ते वेळ मारतात,
मित्र आहेत शेवटी, मित्र असेच असतात,
बाकी सगळं ठीक आहे!

कॉलेजमध्ये धमाल असते,
लेक्चर्स, प्रेझेन्टेशनची मज्जा असते,
कॉलेजमधली दुनियाच वेगळी आहे,
बाकी सगळं ठीक आहे!

सर आणि मैडम खूप चांगले आहेत,
मित्रमंडळी नेहमी सोबत असतात,
पण तरीही काहीतरी मिसिंग वाटत,
बाकी सगळं ठीक आहे!

काळ मित्र घरून परत आला,
त्याच्या आईने आमच्यासाठी लाडू पाठवलेत,
छान आहेत! पण तू बनवतेस तसे लाडू नाहीत,
बाकी सगळं ठीक आहे!

होस्टेलवर दिवाळीला खूप फटाके फोडले,
पहिल्यांदा दिवाळीला घरी नव्हतो,
तुमची सर्वांची खूप आठवण आली,
बाकी सगळं ठीक आहे!

रोज फोनवर बोलणं होतं,
घरातल्या सगळ्या खबरा मिळतात,
पण मी तिथे प्रत्यक्ष नसतो याचं वाईट वाटत,
बाकी सगळं ठीक आहे!

दिवसभर कॉलेजमध्ये दंगा करतो,
संध्याकाळी मित्रांसोबत मज्जा असते,
पण रात्री झोपताना डोळ्यांत पाणी असतं,
बाकी सगळं ठीक आहे!

Saturday, 26 March 2011

'जीवन '= 'G-one'

जीवनातील सुखाचं रहस्य
तेव्हा मला कळलं,
जेव्हा 'जीवन' मी
'G-one' असं लिहिलं!

'One' म्हणजे 'एक', पण
'G' चा अर्थ काय आहे?
'G' चे अनेक अर्थ
माझ्याजवळ तयार आहेत!

'G' चा अर्थ तुम्ही
'GOD' घेऊ शकता,
'सबका मलिक एक' म्हणून
सुखी जीनल जगू शकता!

'G' चा अर्थ तुम्ही
'GOAL' असं घेऊ शकता,
जीवनातील एक ध्येय पूर्ण करून
सुखी जीनल जगू शकता!

'G' चा अर्थ तुम्ही
'GIRL' असं घेऊ शकता,
एकाच मुलीशी एकनिष्ठ राहून
सुखी जीनल जगू शकता!

'G' चा अर्थ तुम्ही
'GAME' असं घेऊ शकता,
जीवन हा एक खेळ मानून
सुखी जीनल जगू शकता!

'G' चा अर्थ काहीही असला
तरी जीवन तुमच्याच हाती आहे,
ते कसा जगायचा?
हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे!

Friday, 25 March 2011

क्षण एक पुरे प्रेमाचा!

जीवनातला प्रत्येक दिवस
म्हणजे थोडं थोडं मरण्याच,
त्या मरणाचा आनंद लुटण्यासाठी
क्षण एक पुरे प्रेमाचा!

रोजच्याच त्या दुखांसाठी
येतो कंटाळा रडण्याचा,
त्या दुखाना सामोरं जाण्यासाठी
क्षण एक पुरे प्रेमाचा!

दरवेळी प्रेमभंग होतो
तरीही प्रयत्न सतत हसण्याचा,
प्रेमाच्या शोधात भटकण्यासाठी
क्षण एक पुरे प्रेमाचा!

प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नाही
तरीही छंद स्वप्ने पाहण्याचा,
स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी
क्षण एक पुरे प्रेमाचा!

त्या एका सोनेरी क्षणासाठी
मी ऋणी आहे तिचा,
तिला भरपूर प्रेम करण्यासाठी मात्र
क्षण एक न पुरे प्रेमाचा!

Wednesday, 23 March 2011

अशीही प्रेम कहाणी...


   
 
 
मी तिच्याकडे सारखा बघतो
पण ती माझ्या कडे बघत नाही,
याचा अर्थ असा नाही की
ती माझ्यावर प्रेम करत नाही!

ती माझ्यावर खरंच
खूप प्रेम करते,
म्हणूनच तर ती मला
रोज भेटायला येते!

ती माझ्याशी खूप गप्पा मारते
पण मी तेव्हा शांत असतो,
बोलता बोलता ती रडायला लागल्यावर
मी अस्वस्थ होतो!

मी तिला खूप समजावतो
पण काही उपयोग होत नाही,
माझ्या मनातल्या भावना
तिला समजत नाहीत!

अंधार पडू लागल्यावर
ती निघून जाते,
जाण्यापूर्वी एक फूल
माझ्या थडग्यावर ठेवून जाते!