आपलं नातं काय आहे? मलाच कळत नाही!
मैत्री, प्रेम की अजून दुसरं काही?
तुला भेटायचा म्हणून मी घरातून लवकर निघतो!
तू उशिरा येतेस म्हणून तुझ्यावर चिडतो!
रोज तुझी वाट पाहण्याची आता सवयचं झाली आहे!
की तू माझी समजूत काढावीस अशी वेड्या मनाची इच्छा आहे?
भेटल्यावर दोघंही शांत असतो, कुणालाच काही सुचत नाही!
फोनवर गप्पा मारताना मात्र आपलं बोलणं संपतच नाही!
बोलायचं नसतं मग भेटतो कशाला? यावर आपण भांडतो!
पण घरी जाताना 'पुन्हा नक्की भेटू' असं नेहमी का सांगतो?
तुला चिडवून, त्रास देऊन अगदी हैराण करतो!
नंतर तुझी समजूत काढून तुझा राग पळवून लावतो!
तुलाही माझ्या चिडवण्याची जणू सवयचं झाली आहे!
की मी समजूत काढतो म्हणून रागसुद्धा नकली आहे?
रात्री एकमेकांना missed call देतो
आणि वर 'झोप नाही लागत का?' विचारतो!
रात्रभर गप्पा मारतो आणि
लेक्चरमध्ये झोपा काढतो!
कुठेही फिरायला जाताना मित्रांची सोबत नकोशी वाटते!
पण उगाच कुणाला संशय येईल म्हणून त्यांचीच ढाल करावी लागते!
मनाला कुठेतरी सुखावून जाते मला तुझ्या नावाने चिडवणे!
तुला चिडवून त्रास देतील म्हणून साफ नाकारतो त्यांचे अंदाज आणि टोमणे!
एकमेकांकडेच बघत बसावसं वाटतं
पण मित्रांमुळे आपण पाहत नाही!
आपण एकमेकांची खूप काळजी घेतो
पण सहसा तसा दाखवत नाही!
माझ्या मनातलं सगळं चेहऱ्यावर दिसतं
पण तुला कळू नये याची काळजी घेतो!
तू मला खूप आवडतेस म्हणून
तुला दुसरा कोणी आवडू नये यासाठी धडपडतो!
'माझं तुझ्यावर प्रेम आहे' हे शब्दचं ओठांवर येत नाहीत!
तुला हरवून बसेन अशी भीती वाटते की अजून मला तसं वाटत नाही?
मी काही नाही सांगणार आणि तूसुद्धा तशीच राहणार!
मग हे आपलं नातं पुढे कोणत्या वाटेने जाणार?
लोकांना वाटत म्हणून affair करायचं? की खरं प्रेम आहे म्हणून?
एवढेच जर एकमेकांना आवडतो मग का नाही टाकत सांगून?
आता काय आहे? पुढे काय होणार? कुणालाच माहित नाही!
आपलं नातं काय आहे? मैत्री, प्रेम की अजून दुसरं काही?