तू परत येशील म्हणून...
त्या bus-stop वर रोज तुझी वाट पाहतो,
अनोळखी चेहऱ्यांत तुझा चेहरा शोधतो,
मनात एकचं इच्छा की तू मला भेटशील,
अशी दूर निघून गेलेली तू परत माझ्या आयुष्यात येशील!
तू परत येशील म्हणून...
तुझी वाट पाहता पाहता दिवस निघून जातो,
"आज नाही तर उद्या तू नक्की येशील", असं मी स्वतःला समजावतो,
प्रेमात लोक जे काही करतात ना ते सगळं मी करेन,
तुला मिळवण्यासाठी मी पुढचे सहा जन्म वाट पाहेन!
तू परत येशील म्हणून...
ताज महालाप्रमाणे घर सजवलं आहे,
तुझ्या आवडीची प्रत्येक वस्तू त्यात रचली आहे,
राजा राणीचा संसार खूप प्रेमाने रंगवला आहे,
तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी समर्थ आहे!
तू परत येशील म्हणून...
तुझी वाट पाहतोय म्हणून जगाने मला वेडं ठरवलंय,
जग गेलं खड्ड्यात! मला तर तुझ्या प्रेमाने वेडं बनवलंय!
दुख आणि वेदना यांच्या पलिकडे मी गेलो आहे,
तुझ्या प्रेमापोटी मी साऱ्या जगाला विसरलो आहे!
तू परत येशील म्हणून...
तुझ्या माझ्या संसाराची अनेक स्वप्नं रंगवली,
स्वप्नांच्या दुनियेत जोडीने मौज केली,
तुझं अस्तित्व आता फक्त स्वप्नांपुरातच उरलं आहे,
तुझ्या आठवणींच्या जाळ्यात मी स्वतःला अडकवलं आहे!
तू परत नाही आलीस...
तुझी वाट पाहता पाहता अखेरीस वाट माझी संपली,
श्वास जरी थांबले तरी आस नव्हती संपली,
मरतानाही एकचं इच्छा की "तू परत यावीस ",
निदान तुझ्या मिठीत माझ्या आत्म्याला मुक्ती मिळावी...