Saturday, 26 May 2012

सामान्य माणूस!

फुटक सिमकार्ड मिळतात म्हणून वापरतो चार - चार फोन,
बँकांना वाईट वाटू नये म्हणून घेतो लोन वर लोन,
क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड आणि ATM कार्ड पण असतं खिशात,
सगळ कसं मस्त चाललंय सामान्य माणसाच्या आयुष्यात!

बाजार, मार्केट आता OLD fashion, म्हणून Mall मध्ये shopping करतो,
SALE च्या नावाखाली गरज नसलेल्या वस्तूही विकत घेतो,
AC ची थंड हवा खाण्यासाठी Mall मध्ये करतो Timepass,
सगळ कसं मस्त चाललंय सामान्य माणसाच्या आयुष्यात!

गाडी नाही परवडत, पण Bike मात्र घेतो,
पेट्रोलचे वाढते दर पाहून बसने प्रवास करतो,
दिवस कसा जातो कळतंच नाही लोकलचे धक्के खात,
सगळ कसं मस्त चाललंय सामान्य माणसाच्या आयुष्यात!

Tax, Bills वगैरे सगळं कसं वेळेवर जमा करतो,
प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून दरवेळी नवीन पक्षाला मतदान करतो,
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी म्हणजे दोन दिवसांची सुट्टी झकास,
सगळ कसं मस्त चाललंय सामान्य माणसाच्या आयुष्यात!

सचिनची सेन्चुरी व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करतो,
जेव्हा संधी मिळेल तेव्हा भ्रष्टाचारी मंत्र्यांना शिव्या देतो,
चोरी, जाळपोळ, बलात्कार यांच्यासोबत हवा कटिंग चहाचा ग्लास,
सगळ कसं मस्त चाललंय सामान्य माणसाच्या आयुष्यात!

बेरोजगारीच्या विळख्यात सापडलाय, महागाईच्या चक्रव्युहात अडकलाय,
बॉम्बस्फोटाच्या भीतीने जीव मुठीत धरून बसलाय,
"उद्याचं उद्या बघू", आज कशाला उगाचं डोक्याला त्रास?
सगळ कसं मस्त चाललंय सामान्य माणसाच्या आयुष्यात!