शाळा...
मुलींची चेष्टा करतो म्हणून कान धरून उभा होतो,
बाईना काय माहित की मी फक्त एकाचं मुलीला चिडवत होतो!
एरवी कुठल्या मुलीशी मी बोलायलाही जाणार नाही,
पण तिच्याशी भांडण केल्याशिवाय मला झोप लागणार नाही!
मुली म्हणजे डोक्याला ताप, मुली म्हणजे कटकट,
पण तरीही माझी नजर तिलाच असते शोधत!
आजकाल माझे मित्र मला तिच्या नावाने चिडवतात,
चेहऱ्यावर जरी राग असला तरी मनात साबणाचे फुगे फुटतात!
प्रेम वगैरे काय म्हणतात ना, तसलं काहीतरी झालं होतं,
माझं मन फक्त तिच्याच विचारांत गुंतलं होतं!
पण, परीक्षा आणि घरच्यांच्या भीतीने सगळं काही थांबलं,
ती तर रोज दिसते पण तिला त्या नजरेने नाही बघितलं!
कॉलेज...
कॉलेजचा पहिला दिवस म्हणून जरा nervous होतो,
त्यात पोहोचायला उशीर झाला म्हणून थरथर कापत होतो!
Punishment म्हणून मला सरांनी मुलीशेजारी बसवलं,
आणि काय सांगू माझं तर नशिबच उघडलं!
तिचे ते मोकळे केस आणि केसांतून हात फिरवण,
विचार करताना ते ओठांवरून पेन फिरवण!
तिची प्रत्येक हालचाल मी अगदी जवळून पाहत होतो,
नकळत तिच्या केसांना हळूच स्पर्श करत होतो!
दिवसेंदिवस आमची ही ओळख अशीच वाढत गेली,
अभ्यास करता करता आमची चांगली मैत्री जमली!
Lectures , Submissions सगळं नियमित सुरु होतं,
तिच्यासाठीच माझं प्रेम हळूहळू वाढत होतं!
खूप विचार केला की तिला माझ्या feelings नीट समजावून सांगेन,
नाहीतर प्रेयसी मिळवण्याच्या प्रयत्नात चांगली मैत्रीण हरवून बसेन!
तिच्यासोबत मी असणं, हे जास्त महत्वाचं होतं,
म्हणून तिला जगासमोर मैत्रीण आणि स्वप्नात प्रेयसी मानलं होतं!
ऑफिस...
मला वाटलंही नव्हतं की ऑफिससारख्या Boring ठिकाणी,
मला असं कोणीतरी Interesting भेटेल!
कामाचं कितीही टेन्शन असलं तरी
तिची एक smile सगळं refresh करेल!
मी जरी कामात असलो तरी माझे कान तिची चाहूल घेत असतात,
तिचं हसणं, बोलणं असं सगळंकाही चोरून ऐकत असतात!
ती जिथे जिथे जाईल तिथे तिथे माझी नजर आपोआप फिरते,
तिने वळून बघितल्यावर मात्र चटकन मान दुसरीकडे वळते!
रोज ठरवतो की आज तिच्याशी बोलायचं,
तिच्या पायाशी स्वतःच हृदय काढून ठेवायचं!
ती नाही म्हणणार हे नक्की,
पण ऑफिसमध्ये असलं धाडस करायचं?
....
ते दिवस आठवले की माझं मला हसू येत,
मी किती मूर्खपणे वागलो याचं मला नवल वाटत!
तेव्हाचं ते प्रेम आणि मनात असणाऱ्या भावना,
आतून खूप असं वाटत असलं तरी व्यक्त न करता येणाऱ्या!
आजही बायकोला "I Love You" म्हणताना डोक्याला घाम फुटतो,
बायको रागावून म्हणते की मी मुलांसमोर भलतं-सलतं बोलतो!
मनातल्या भावना शेवटी मनातच राहतात, पण बायको मात्र सगळं ओळखते,
म्हणून रात्री झोपताना हळूच कानात "I Love You Too" म्हणते!