जीवनाच्या वाटेवर आपण एकटेच असतो चालत,
परिस्थितीच्या खड्ड्यांतून स्वतःला सावरत,
वाटतं...कुणीतरी यावं, द्यावा आपल्याला आधार,
प्रत्येकजण शोधत असतो असाच एक जोडीदार!
आपली एक हाक ऐकून त्याने धावत यावं,
Superman बनून आपल्याला वाचवावं,
वाटतं...सगळ्या problems चं solution त्याच्याकडून मिळणार,
प्रत्येकजण शोधत असतो असाच एक जोडीदार!
आनंदात नाचताना त्यानेही सोबत ताल धरावा,
डोळ्यांत अश्रू आले तर पुसायला त्याने रुमाल द्यावा,
वाटतं...आपल्या मनातलं सगळं त्याला समजणार,
प्रत्येकजण शोधत असतो असाच एक जोडीदार!
त्याने नेहमी सोबत राहावं, सगळे हट्ट पूर्ण करावे,
राग आल्यावर त्याने आपल्याला प्रेमाने समजवावे,
वाटतं...त्याच्या मिठीतच आपले सर्वस्व सामावणार,
प्रत्येकजण शोधत असतो असाच एक जोडीदार!
आपण ज्याला जोडीदार बनवतो, त्याचे आपण असतो जोडीदार,
आपण ज्या अपेक्षा करतो, त्या त्याच्या कोण पूर्ण करणार?
खरंच आपण किती स्वार्थी असतो, करतो फक्त स्वतःचा विचार,
मग बनणार का तुम्ही एकमेकांचे पक्के जोडीदार???