अशी जवळ बस, मला खूप काही सांगायचंय,
तुझ्या-माझ्या, आपल्याबद्दल खूप काही ठरवायचंय,
यापुढचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत रहायचंय,
मला तुझ्यावर भरभरून प्रेम करायचंय!
तुझा प्रत्येक शब्द नाजुक फुलाप्रमाणे जपेन,
तुझी प्रत्येक फ़रमाइश मी पूर्ण करेन,
माझ्या दुनियेची राणी तुला बनवायचय,
मला तुझ्यावर भरभरून प्रेम करायचंय!
तुझ्या डोळ्यांत अश्रू न येणं, हे माझं ध्येय असेल,
तुझ्या सगळ्या समस्यांचं समाधान पण मी असेन,
तुला नेहमी सुखात - आनंदात ठेवायचंय,
मला तुझ्यावर भरभरून प्रेम करायचंय!
मला जास्तं काही नको, फक्त हवा तुझा सहवास,
नेहमी पाठीशी असणारा एक खंबीर आधार,
तुझा हात धरून जीवनाच्या वाटेवर चालायचय,
मला तुझ्यावर भरभरून प्रेम करायचंय!
कुठे आहेस तू? वाट पाहतोय मी तुझी,
हृदयातली ती जागा अजूनही आहे रिकामी,
एकटं राहून कंटाळलोय, मला फक्त तुझ्यासाठी जगायचंय,
मला तुझ्यावर भरभरून प्रेम करायचंय!