आज घरी लवकर जायचं म्हणून पटापट कामं आवरली,
आणि आयत्यावेळी बॉसने meeting बोलावली!
विषयावर विषय निघाले आणि meeting चार तास चालली,
Family सोबत फिरायला जाण्याची माझी planning बोंबलली!
बायकोला फोन करून सांगितलं "सॉरी आज नाही जमणार",
रोजचंच झालं होतं हे, पण मी तरी काय करणार?
ऑफिसच्या कामामुळे Family Life बिघडत होतं,
ऑफिसमधलं frustration घरच्यांवर निघत होतं!
बसमध्ये धक्के खात घरचा प्रवास सुरु होता,
मनात मात्र हिरमुसलेली मुलं आणि रागावलेल्या बायकोचा चेहरा फिरत होता!
घरी जाऊन सगळ्यांना सॉरी म्हणावं लागणार होतं, पुढच्यावेळी असं नाही होणार
असं promise पुन्हा एकदा करावा लागणार होतं!
धावत घरी आलो, बेल वाजवली पण दार नाही उघडल,
यावेळी घरी कोणी नाही? म्हणून जरा नवल वाटल!
बाल्कनीच्या खिडकीतून जरा आत डोकावून पाहिलं,
घरामधल दृश्य पाहून माझं डोकं चक्रावल!
एखाद्या family सिरीयलचा जणू एपिसोड सुरु होता,
डायनिंग टेबलवर पिंकी drawing करत होती, तर राजू शांतपणे अभ्यास करत होता!
माझी बायको सोफावर बसून TV बघत होती आणि
बेडरूम मधून कोणीतरी बाहेर येत होता!
आणि बघतो तर काय? बेडरूम मधून "मी" बाहेर आलो,
तुम्हाला खोट वाटेल पण खिडकीच्या पलिकडून मी स्वताला पाहत होतो,
असं अजब कसं घडत होता? एकाचवेळी मी दोन ठिकाणी कसा होतो?
कोणी माझा चेहरा लावून आलं होतं की मी वेडा झालो होतो?
घरातला "मी" फार वेगळा होतो, शांत, समाधानी, आनंदी दिसत होतो,
चेहऱ्यावर ना निराशा होती ना राग होता, दमलो होतो खर पण उत्साही होतो!
मुलांशी हसत खेळत मज्जा करत होतो, तर बायकोशी प्रेमाने गप्पा करत होतो,
सगळी टेन्शन्स बाजूला ठेवून जीवनाचा आनंद लुटत होतो!
तो घरातला "मी", खरंच मी नव्हतो, मी असा आनंदी राहूच शकत नव्हतो,
ऑफिसची टेन्शन्स, वाढती महागाई, अशा प्रश्नांनी खचून गेलो होतो!
ऑफिसच frustration मुलांवर निघत होता आणि बायकोशी उगाचच वाद घालत होतो,
पैशाच्या मागे धावताना Family Life हरवून बसलो होतो!
मला आठवतही नाही की कधी मी मुलांशी हसत खेळत बोललो होतो?
बायकोला प्रेमाने जवळ घेऊन प्रेमाने गप्पा करत बसलो होतो?
कुटुंब जणू फक्त एक जबाबदारी बनली होती, ज्यांच्यासाठी मी पैसे कमावत होतो,
येणारा प्रत्येक दिवस म्हणजे शिक्षा समजून जीवनाची गाडी ढकलत होतो!
मी पुन्हा खिडकीतून आत पाहिलं, घरात किती प्रसन्न वातावरण होत!
माझ्या घरच हे दृश्य असेल असं कधीच मला वाटल नव्हत!
सगळं काही सेम होत, फरक फक्त एकचं होता,
मला जे जमत नव्हतं ते घरातला "मी" करत होता!
का मी आनंदी राहू शकत नव्हतो? कुटुंबाला आनंदी ठेवू शकत नव्हतो?
अडचणींच्या ओझ्याखाली दाबून स्वताला हरवून बसलो होतो!
अडचणी ह्या येणारच, त्यांना हसत हसत सामोरं जायला हव,
सगळ्या दुखाना विसरून आनंदी जीवन जगायला हव!
बस्स! ठरलं तर मग! आता नेहमी आनंदी, समाधानी राहायचं,
सगळ काही विसरून family सोबत सुखी जीवन जगायचं!
आता माझ्याही घरात नेहमी प्रसन्न वातावरण असेल,
नसेल निराशा नसेल दुख, फक्त सुख समाधान असेल!
याचं विचारांत असताना डोकं माझं आपटलं खिडकीवर,
डोक्याला हात धरून डोळे उघडले आणि मी होतो बसच्या window सीटवर!
तेव्हा मला कळलं की ते एक स्वप्न होत,
स्वप्न जरी असलं तरी खूप काही शिकवलं होत!
त्या एका स्वप्नामुळे माझा दृष्टीकोन बदलला,
सुखी जीवन जगण्याचा मला मंत्र कळला!
त्या दिवसापासून मी तो "घरातला मी" बनलो आहे,
आणि खिडकीतून डोकावणाऱ्या त्या "मला", खिडकीबाहेर ठेवलं आहे!