सोमवार ते रविवार, मला कोणताही दिवस चालतो,
Celebration करायला चान्सच शोधात असतो,
मित्रांसोबत गप्पांना बार मध्ये रंग चढतो,
धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगुळा मिळावा, म्हणून मी दारू पितो!
ऑफिसमध्ये साहेबाच्या 'हो' ला 'हो' मिळवतो,
स्वतः फटके खाऊन साहेबाची खुर्ची सांभाळतो,
दारू चढल्यावर साहेबाची 'अ' ते 'भ' करतो,
नुस्त बोलून तरी मनाला शांती मिळावी, म्हणून मी दारू पितो!
मंत्र्यांना शिव्या घालणारा मी, उघड-उघड भ्रष्टाचार करतो,
दुसऱ्यापेक्षा जास्त सुख मिळवण्यासाठी देवालासुद्धा लाच देतो,
जगासमोर वावरताना नेहमी खोटे मुखवटेच लावतो,
'खरं' बोलण्याची हिम्मत व्हावी, म्हणून मी दारू पितो!
लहानपणी रंगवलेली स्वप्न अजूनही स्वप्नातच पाहतो,
खूप काही करायचं होतं पण प्रत्यक्षात फार कमी करू शकलो,
बाकीच्यांची मन सांभाळताना स्वतःच मन मारत राहिलो,
'सत्य आणि स्वप्न' यांचा Balance सांभाळता यावा, म्हणून मी दारू पितो!
जशी महागाई वाढतेय तसा पगार काही वाढत नसतो,
कुटुंबाच्या गरजा पुरवताना कपाळाला घाम फुटतो,
Adjustment आणि Compromise च्या जोरावर संसाराचा गाडा रेटतो,
अपयश आणि नैराश्य सहन करता याव, म्हणून मी दारू पितो!
कधी कधी दारूच्या नशेत बायकोला खूप काही बोलतो,
स्वतःवरचा राग मग त्या बिचारीवर निघतो,
कान धरून तुझी मी मनापासून माफी मागतो,
तुझ्यासमोर तरी मी रडू नये, म्हणून मी दारू पितो!
"उद्यापासून दारू बंद!" असं रोज रात्री ठरवतो,
आजची रात्र शेवटची म्हणून फुल्ल टल्ली होतो,
परिस्थितीने केलेल्या जखमांवर दारूचं औषध लावतो,
डॉक्टरकडे जाणं परवडणार नाही, म्हणून मी दारू पितो!

No comments:
Post a Comment