Wednesday, 12 December 2012

गेलीस उडत!


Girlfriend म्हणजे असतो उगाच डोक्याला ताप,
स्वताच का लावून घ्यायची स्वताची वाट?
प्रेम करतो तुझ्यावर, तुझी चाकरी नाही करत,
रहायचं असेल तर रहा नाहीतर गेलीस उडत!

कुत्रा नाही मी तुझ्या मागे मागे फिरायला,
वेड नाही लागलं मला तुझं सगळं ऐकायला,
मला पण Brain आहे जो मी नेहमी असतो वापरत,
रहायचं असेल तर रहा नाहीतर गेलीस उडत!

मी काय घालायचं, काय खायचं हे सगळं तू ठरवणार,
मी कोणत्या friends सोबत बोलायचं हे तू मला सांगणार,
माझं Life कसं जगायचं? हे मी असतो ठरवत,
रहायचं असेल तर रहा नाहीतर गेलीस उडत!

दुसऱ्या मुलींशी बोललो तर तुला येतो राग,
तुला वेळ नाही देऊ शकलो तर तुझा होतो संताप,
मी का नाही तुझ्यावर तेवढाच हक्क गाजवू शकत?
रहायचं असेल तर रहा नाहीतर गेलीस उडत!

प्रेम करतो तुझ्यावर म्हणून तुला Propose केलं,
तू आवडतेस म्हणून तुला आहेस तशी स्वीकारलं,
पण प्रत्येक गोष्टीची Limit असते, त्यापलिकडे सहन नाही करू शकत,
रहायचं असेल तर रहा नाहीतर गेलीस उडत!

2 comments: