Tuesday, 9 October 2012

अजूनही ते डोळे...

काल कपाटाची साफसफाई करताना 'तिचा' फोटो सापडला,
आणि मनाच्या पेटीतला त्या आठवणींचा कप्पा उलगडला,
त्या फोटोमधून तिचे डोळे माझ्याशी बोलतात,
अजूनही ते डोळे मला काहीतरी सांगतात!

तिचे डोळेच कारणीभूत होते मी प्रेमात पडण्यासाठी,
एकचं इच्छा होती ' स्वताला तिच्या डोळ्यांत पाहण्याची',
'एवढं प्रेम करणारे का बरे वेगळे होतात?'
अजूनही ते डोळे मला हा प्रश्न विचारतात!

तिच्यापेक्षा जास्त तिचे डोळेच बोलतात,
हसतात, रडतात आणि कधी लाजतात,
मी नाराज झाल्यावर हळूच सॉरी म्हणतात,
अजूनही ते डोळे मला खूप आवडतात!

तिच्या डोळ्यांतलं पाणी कधीच नाही संपायच,
कितीही समजूत घातली तरी रडणं नाही थांबायचं,
रडणाऱ्या बाळाला अस एकट का सोडतात?
अजूनही ते डोळे मला तिच्याजवळ बोलावतात!

फोटोमधल्या तिला आणि तिच्या डोळ्यांकडे पाहत होतो,
तिच्यासोबतचा प्रत्येक क्षण पुन्हा एकदा जगत होतो,
हे दोन डोळे जरी वेगळे असले तरी ते सोबत असतात,
अजूनही ते डोळे मला तिची सदैव साथ देतात!

1 comment: