बेइमानिच्या बाजारात विकली जात आहे
"माणुसकी",
फसवणुकीच्या दरबारात होत आहे "सत्याची" होळी,
"प्रामाणिकपणा" कधी काळीच रिटायर झाला होता,
कारण "पैसा" झालाय मोठा आणि "माणूस" झालाय खोटा!
आज-काल माणुसकी फक्त नावालाच आहे उरली,
माणुसकी सोडा, लोकं रक्ताच्या नात्यांना आहेत विसरली,
मैत्री, प्रेम सगळं झूठ! लोकांना दिसतात फक्त नोटा!
कारण "पैसा" झालाय मोठा आणि "माणूस" झालाय खोटा!
खरं बोलणारा माणूस इथे क्वचितच सापडतो,
प्रत्येकजण दुसऱ्याला फसवून स्वतःचा फायदा करतो,
जो खरा वागतो त्याचा नेहमीच होतो तोटा,
कारण "पैसा" झालाय मोठा आणि "माणूस" झालाय खोटा!
चिरीमिरी दिल्याशिवाय इथे कामच होत नाही,
टेबलाखालून सरकवल्याशिवाय फाईलसुद्धा हलत नाही,
प्रामिकपणे न वागण्याचा जणू नियमच केला होता,
कारण "पैसा" झालाय मोठा आणि "माणूस" झालाय खोटा!
पैश्याच्या लखलखाटात माणूस आंधळा झाला आहे,
पैशाच्या ताकदीसमोर स्वतःला हरवून बसला आहे,
विसरला आहे की पैश्याने माणूस नाही, माणसाने पैसा बनवला होता,
कारण "पैसा" झालाय मोठा आणि "माणूस" झालाय खोटा!
bitter true !!!
ReplyDelete