देशभक्तीपर
गीतांचा मारा सुरु
होईल,
पुन्हा एकदा ती
गाणी ऐकण्याचा दिवस
आला होता,
गाणी ऐकून प्रेरणा
मिळाली तरी ती
तेवढ्यापुरतीच आहे,
कारण मी फक्त
२ दिवसांसाठीचा भारतीय
आहे!
प्रत्येकाच्या
छातीवर तिरंगा झळकेल,
SMS, Facebook वर
देशाचा उद्धार होईल,
ही देशभक्ती फक्त share आणि
like पुरतीच मर्यादित आहे,
कारण मी फक्त
२ दिवसांसाठीचा भारतीय
आहे!
जागोजागी ध्वजारोहण केलं जाईल,
मोडकं-तोडकं का होईना
पण राष्ट्रगीत गायलं
जाईल,
पिक्चरच्या
आधी लागलं की
उभं राहायला पण
कंटाळा आहे,
कारण मी फक्त
२ दिवसांसाठीचा भारतीय
आहे!
राष्ट्रध्वजाला
सलाम एवढीच ती
काय माझी देशभक्ती,
वर्षातले हे २
दिवस म्हणजे हक्काची
सुट्टी,
Sunday ला आले की
१५ ऑगस्ट पण
waste आहे,
कारण मी फक्त
२ दिवसांसाठीचा भारतीय
आहे!
आज जितके भारतीय आहोत
तेवढेच रोज का
नाही?
प्रत्येक क्षणी देशाला तुमची
गरज आहे,
पण आपला-आपला
स्वार्थ हेच आमचं
ध्येय आहे,
कारण मी फक्त
२ दिवसांसाठीचा भारतीय
आहे!
देशाला भ्रष्टाचाराने ग्रासलंय, महागाईने मारलंय,
आज कालच्या नेत्यांनी तर
देशाला विकायला काढलंय,
देश जाऊदे खड्ड्यात तरी
मी निवांत आहे,
कारण मी फक्त
२ दिवसांसाठीचा भारतीय
आहे!
ज्या तिरंग्यासाठी रक्त वाहिलं
गेलं तो उद्या
कचऱ्यात दिसणार आहे,
ज्या स्वतंत्र भारताचं स्वप्न
बघितलं ते स्वप्नच
राहणार आहे,
स्वतंत्र झालो तरी
अजून गुलामगिरीतच जगत
आहे,
कारण मी फक्त
२ दिवसांसाठीचा भारतीय
आहे!
No comments:
Post a Comment